ब्रेकिंग न्यूज़

काश्मीरात काही भागांमध्ये प्रार्थनांनंतर जवानांवर दगडफेक

काश्मीरच्या काही भागांत काल ईद सणानिमित्तच्या प्रार्थना झाल्यानंतर निदर्शक व सुरक्षा दलाचे जवान यांच्यात संघष निर्माण झाला. निदर्शकांनी जवानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याचे वृत्त आहे. मात्र त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
राज्यात ठिकठिकाणच्या इदगाह, मशिदी व अन्य धार्मिक जागांवर नमाज पठण तसेच प्रार्थनांसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मात्र प्रार्थना संपल्यानंतर सुरक्षा दलांवर निदर्शकांकडून दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले. उत्तर काश्मीरच्या सोपोर व दक्षिणेतील अनंतनाग या भागांमध्ये अशा घटना घडल्या. नौहट्टा परिसरात तोंडावर बुरखे घातलेल्या निदर्शकांनी हातात जैश ए महमद या दहशतवादी संघटनेचे म्होरके मसूद अझर व झकीर मुसा यांची छायाचित्र असलेले बॅनर हातात घेतले होते. निदर्शक दगडफेक करीत असतानाही सुरक्षा दलांनी परिस्थिती संयमाने हाताळली असे सूत्रांनी सांगितले. राज्याच्या अन्य भागांमध्ये परिस्थिती शांततापूर्ण होती.