काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद

शतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील निरीक्षकाचाही समावेश आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार मारण्यात यश आले. त्यानंतर रात्री ८ वाजता दुसरा दहशतवादी सुरक्षा दलाने ठार केला.

दुचाकीवरून आलेल्या दोन दहशतवाद्यांनी प्रथम जवानांवर ग्रेनेडद्वारे हल्ला केला. स्फोटानंतर त्यांनी एके – ४७ रायफलने अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एकूण आठ लोक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. अनंतनाग पोलीस स्टेशनचे एसएचओ असद खान यांच्यासह पाच सीआरपीएफ कर्मचारी आणि इतर दोन गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांमध्ये एक स्थानिक महिला देखील सामील आहे. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍याने सांगितले की, दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या एका पथकाने दहशतवाद्यांना पाठलाग केला. सुरक्षा दलाचे सुरक्षा कवच तोडण्यासाठी दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला.

राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला
जम्मू – काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये विरोधकांकडून करण्यात येणार्‍या निवडणुकीच्या मागणीला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.