ब्रेकिंग न्यूज़
काय आहे कुंडलिनी क्रिया योग?

काय आहे कुंडलिनी क्रिया योग?

* धर्म शास्त्रानुसार कुंडलिनी क्रिया योगाचे मूळ हे महावतार शिव गोरक्ष बाबाजींच्या प्राचीन साहित्यातील सिद्ध सिद्धांत पद्धतींमध्ये सापडते. हा मानवी विकासाचा एक दिव्य मार्ग असून याचा संदर्भ आपल्याला प्राचीन ग्रंथात जसे भगवद् गीता आणि गोरक्ष संहिता यांमध्येही मिळतो.
* मानवी जागृतीचे वा विकासाचे हे विज्ञान कोणत्याही धर्म, संप्रदाय किंवा श्रद्धेशी संबंधित नाही. ही पद्धती घरगुती योग्यांसाठी तयार केली गेली आहे ज्यांना अष्टांग योगाच्या सर्व अंगांचा अभ्यास करणे शक्य नसते.
* कुंडलिनी शक्ती जी स्पायनल कॉर्डच्या मुळाशी (मूलाधार चक्र) असते, ती एक इलेक्ट्रो-मॅग्नेटिक प्राणशक्ती आहे. स्पायनल श्‍वासोच्छ्वासाचा सराव करून (कुंडलिनी श्‍वास) ही कुंडलिनी शक्ती जागृत व क्रियाशील बनवता येते, ज्यामुळे त्यातील प्राणशक्ती मुलाधार चक्रापासून वर स्पायनल कॉर्डमधून जाऊन एका पोकळीपर्यंत पोहोचते जी पोकळी तिसर्‍या व्हेंट्रीकलमध्ये असून त्याला ‘आज्ञा चक्र’(सीट ऑफ द सोल) असे म्हणतात.
* ही क्रिया मानवाचा आध्यात्मिक विकास घडवून आणते आणि याचा सराव करणार्‍यांना ती बरेच सर्वांगीण म्हणजेच शारीरिक, मानसिक, भावनिक आणि नक्षत्रीय पातळीवरील लाभ मिळवून देते.
कुंडलिनी क्रिया योगाचे काही फायदे
* काया कल्प – शरीराची खराब होण्याची आणि झीज होण्याची क्रिया थांबवते, धरून ठेवते आणि परतवून लावते.
* कोश स्वास्थ्य – शारीरिक, भावनिक, मानसिक आणि नक्षत्रीय भागांचे स्वास्थ्य राखते.
*़ जागृती – कुंडलिनी जागृत करते.
*़ कर्म निर्मूलन – मनुष्याचे कर्म बदलवते, प्रभाव कमी करते आणि कर्म संपवते.16