कामगार कायदा दुरुस्तीच्या निषेधार्थ कामगारांची निदर्शने

केंद्रातील एनडीए सरकारच्या ४० कामगार कायद्यांमध्ये दुरुस्तीच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ पाटो पणजी येथील मजूर आयुक्तालयासमोर (आयटक) च्या गोवा शाखेने काल निदर्शने केली.

केंद्र सरकारचा ४० कामगार कायद्यांत दुरुस्ती करून ४ कामगार संहिता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला कामगारवर्गाकडून विरोध केला जात आहे, अशी माहिती ख्रिस्तोफोर फोन्सेका यांनी दिली. कामगार कायद्यात दुरुस्ती कामगार वर्गाच्या हिताच्या विरोधात आहे. या कायद्याच्या माध्यमातून कामगारांना थोडीशी सुरक्षा प्राप्त झालेली आहे. कामगार कायद्यातील दुरुस्तीमुळे कामगारावर जास्त अन्याय होण्याची शक्यता आहे, असेही फोन्सेका म्हणाले.