करकरेबद्दल वक्तव्य; साध्वी प्रज्ञांची माफी

मुंबई एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अखेर काल संध्याकाळी आपले शब्द मागे घेतले. माझ्या वक्तव्यामुळे देशाच्या शत्रूंचा फायदा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेत असून त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करते. मात्र, ते माझे वैयक्तिक दु:ख आहे, असे साध्वी प्रज्ञा यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.