कदंब बसेस बेळगावला धोका पत्करून जाणार नाही

गोवा बेळगाव महामार्ग वाहतुकीसाठी कधी सुरू होईल हे या घडीला सांगणे कठीण आहे, अशा प्रतिक्रिया कदंब महामंडळाचे चेअरमन तथा आमदार कार्लुस आल्मेदा यानी काल दिली. गोवा ते बेळगांव या दरम्यानचे तिन्ही महामार्ग सध्या बंद आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या एसटी बसेस तसेच गोव्याच्या कदंब बसेस गेल्या ८-१० दिवसांपासून ह्या मार्गावरून प्रवास करू शकलेल्या नाहीत. आल्मेदा यांना काल यासंबंधी विचारले असता गोवा बेळगांव महामार्ग वाहतुकीसाठी कधी खुले होऊ शकतील हे सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले. कर्नाटक सरकार या महामार्गांवरून आपल्या बसेस कधी सुरू करतात याकडे आमचे लक्ष लागून राहिले आहे, असे