ब्रेकिंग न्यूज़

‘ओव्हरी’चा कर्करोग  भाग – २

वैद्य (सौ) स्वाती हे. अणवेकर (म्हापसा)
ज्या स्त्रिया योनी प्रदेशात टालकम पावडर लावतात त्यांनादेखील हा कर्करोग होऊ शकतो. तसेच धुम्रपान करणार्‍या स्त्रियांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
२) ओवरीचेलो मॅलिग्नंट पोटेन्शियल ट्यूमर ः
ह्याचे प्रमाण १५% आढळते. तेसिरस म्युसिनस पेशींपासून निर्माण होतात. ह्याचा आकार बरेचदा मोठा असतो व ह्याची लक्षणेदेखील लगेच दिसतात. पण ह्याचा प्रसार अन्य भागात मात्र क्वचित आढळतो. म्हणूनच अगदी गंभीर अवस्थेत असलेली रुग्ण देखील आजारातून बरी होते.
३) जर्मसेल ओव्हॅरीयन ट्यूमर ः
हा कर्करोग अंडाशयाच्या प्रजनन करणार्‍या पेशींपासून उत्पन्न होतो व हा अगदी कुमार व तारुण्यात देखील स्त्रियांना होतो. पण ह्यांचे प्रमाण फारच कमी आढळते.
४) स्ट्रोमल ओव्हॅरीयन कॅन्सर ः
ह्याची उत्पत्ती अंडाशयाच्या सहकार्य करणार्‍या अर्थात सपोर्टिंग टिश्यूपासून होते. हेदेखील क्वचित आढळतात.
कर्करोग हा ओव्हरीच्या असंख्य पेशींमधील कुठ्ल्याळी पेशीपासून उत्पन्न होऊ शकतो.
अंडाशयाचा कर्करोग होण्याची कारणे ः
१) ज्या स्त्रियांची मासिकपाळी व ऋतुकाळ अर्थात ओव्ह्युलेशन सायकल   जेवढे जास्त तेवढी ओव्हरीचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. उदा : ज्या स्त्रियांना मासिक पाळी लवकर सुरु होते व रजोनिवृत्ती उशिरा येते व ज्या स्त्रियांना गर्भधारणा होत नाही त्यांना हा कर्करोग होण्याचा धोका जास्त संभवतो.
२ )इठउA१ व इठउA२ ह्या जनुकांमध्ये घडलेले विकृत व अनैसर्गिक बदल हे त्या स्त्री मध्ये ओव्हरीचा अथवा स्तन कर्करोग उत्पन्न होण्याचा धोका अधिक असतो.
३) ज्या स्त्रिया स्थूल असतात त्यांच्यामध्ये हा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
४) ज्या स्त्रिया सतत कठढ अर्थात होर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात त्यांना देखील हा कर्करोग होऊ शकतो.
५) ज्या स्त्रिया योनी प्रदेशात टालकम पावडर लावतात त्यांना देखील हा कर्करोग होऊ शकतो.
६) तसेच धुम्रपान करणार्‍या स्त्रियांमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
आता आपण ह्या कर्करोगाच्या अवस्था व ह्या रुग्णातील ५ वर्षे आयुर्मानाचा कालावधी टक्केवारी जाणून घेऊ :
क्रमांक अवस्था प्रसार ५ वर्षे आयुर्मान टक्केवारी
१ १ ओव्हरीपर्यंत मर्यादित ९०-९५%
२ २ कटी भागापर्यंत मर्यादित ७०-८५%
३ ३ उर प्रदेशात पसरतो २०-५०%
४ ४ अन्य भागातील अवयवात पसरतो १-५%
आता आपण ह्या कर्करोगाची लक्षणे जाणून घेऊ :
१) त्या स्त्रीला जास्त थकवा जाणवतो.
२) पोट भरल्याची संवेदना कायम असते.
३) अचानक त्या स्त्रीला कपडे घट्ट बसू लागतात.
४) त्या स्त्रीचे पाय सुजतात.
५) त्या स्त्रीच्या पोटात देखील सूज येते.
६) संडासला जाण्याच्या तिच्या सवयीत बदल होतो.
७) त्या स्त्रीच्या लघवीच्या सवयी देखील बदलतात.
८) त्या स्त्रीच्या पोटात दुखू लागते.
९) तिला काही काम केले अथवा चालले की धाप लागते.
हा कर्करोग झाला आहे हे काही चाचण्या करून मग निश्चित केले जाते त्या कोणत्या ते आपण पाहू :
१) लीं स्कॅन
२) झएढ स्कॅन
३) उA-१२५ हि रक्ताची चाचणी
४) कए-४
५) जतA-२
६) र्जींशीर
ह्या सर्व चाचण्या करून रुग्णाला खरोखरच ओव्हरीचा कर्करोग झाला आहे अथवा नाही हे पहिले जाते.
ओव्हरीच्या कर्करोगाचे उपचार :
१) शस्त्रक्रिया : ह्यात ओव्हरी व गर्भाशय पूर्णपणे काढून टाकतात.
२) किमोथेरपी
३) टार्गेटेड थेरपी ः ह्यात औषध हे फक्त कर्करोगग्रस्त पेशींमध्येच सोडले जाते ज्यामुळे निरोगी पेशींना अपाय मुळीच होत नाही
आता आपण ओव्हरीच्या कर्करोगापासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो ते पाहूयात :
१) योग्य वयात लग्न करून वेळेवर गर्भधारणा होणे.
२) बाळाला नीट स्तनपान करणे.
३) सर्व प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहणे.
४) व्यायाम नियमित करणे.
५) वजन आटोक्यात ठेवणे.
६) तणावमुक्त जीवन जगणे.