एक दिवशीय अधिवेशनास सहमती नव्हती ः कामत

सर्वपक्षीय बैठकीत एक दिवशीय अधिवेशन घेण्यास विरोधी आमदारांनी सहमती दर्शवली असेल तर सदर निर्णयासबंधी विरोधी आमदारांच्या सह्या असलेला सदर बैठकीचा इतिवृतांत जाहीर करावा.

एक दिवसीय अधिवेशनाचे कामकाज कसे असावे ते मी सभागृह कामकाज समितीच्या बैठकीवेळी सादर केलेल्या पत्रात स्पष्ट केल्याचा दावा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आरोग्यमंत्र्यांसह कोविडवर चर्चा करण्याची तयारी दाखवायला हवी होती.

मात्र सरकार विरोधकांना घाबरले होते. त्यामुळेच त्यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचा आरोप कामत यांनी केला. आता राज्यपालांच्या निर्णयावर आम्ही पुढील कृती ठरविणार असे ते म्हणाले.