निकालाआधी मायावती सोनिया गांधींना भेटणार

एनडीएविरोधात निवडणूक निकालानंतर महाआघाडी उभारण्यासाठी बसपा नेत्या मायावती २३ मेपर्यंत युपीएच्या नेत्या सोनिया गांधी व कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी अलीकडेच याच दृष्टीकोनातून सोनिया, राहुल गांधींसह शरद पवार व अन्य नेत्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे. नायडू यांनी पुन्हा काल (रविवारी) उभयतांची भेट घेतली. ते लखनौत मायावती यांनाही भेटले आहेत.