ऍप आधारीत टॅक्सी सेवेला टुरिस्ट टॅक्सीवाल्यांचा विरोधच

राज्यातील टूरिस्ट टॅक्सी मालकांचा गोवा माईल्स या ऍपआधारित टॅक्सी सेवेला विरोध कायम असून गोवा माईल्स ऍप रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत, अशी माहिती अखिल गोवा टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आमची भूमिका मांडलेली आहे. गोवा विधानसभेत तीन तास चर्चा करण्यात आल्यानंतर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दोन महिने ऍप सेवेचा वापर करण्याची विनंती केली आहे. परंतु, टॅक्सी मालकाना गोवा माईल्स ऍप नको आहे. टॅक्सी मालक गोवा माईल्स या ऍप आधारित टॅक्सी सेवेमध्ये सहभागी होण्यास तयार नाहीत.