उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला

शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.

काल शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले. तत्पूर्वी, त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. मंत्रालयातील महिलांनी औक्षण केल्यानंतर उद्धव यांनी पदभार स्वीकारला.