ब्रेकिंग न्यूज़

ईडीसी व आयडीबीआय यांचा कर्जवसुली कारवाईबाबत निर्णय

>> आयडीबीआय वरिष्ठांशी कुंकळयेकरांची चर्चा

ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष संतोष केंकरे व व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र वेर्णेकर यांनी काल आयडीबीआय बँकेच्या कार्यकारी संचालक मैथिली यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत ईडीसी व आयडीबीआय यांनी ज्यांना संयुक्तपणे कर्ज दिले होते व त्यापैकी जे कर्जदार कर्जाची परतफेड करीत नाहीत त्यांच्याकडून कर्ज वसूल करून घेण्यासाठी संयुक्तपणे आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे ठरले. जे कर्जदार कर्जाची परतफेड करत नाहीत. त्यांच्याकडून ती परतफेड करून घेण्यासाठी कोणकोणती पावले उचलता येतील याची माहितीही मैथिली यांनी यावेळी दिली.
ईडीसीला अन्य कोणत्याही बाबतीत आयडीबीआयकडून सहकार्य हवे असल्यास तेही देण्याचे आश्‍वासन मैथिली यांनी यावेळी दिले.