ब्रेकिंग न्यूज़
ईएसजी ‘बीग बी’कडून होकाराच्या प्रतीक्षेत

ईएसजी ‘बीग बी’कडून होकाराच्या प्रतीक्षेत

इफ्फी उद्घाटनाचे निमंत्रण
गोवा मनोरंजन सोसायटीने यंदाच्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाची यापूर्वीच घोषणा केलेली असली तरी अमिताभ बच्चन यांनी अजूनही आपला होकार कळवला नसल्याने ईएस्‌जी त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचे ईएस्‌जीमधील सूत्रांनी सांगितले. काल आपला ७२ वा वाढदिन साजरा करणारे अमिताभ बच्चन या शुभदिनी आपला होकार कळवतील अशी आशा होती. पण ती केवळ आशाच ठरल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र, तसे असले तरी बच्चन, हे निमंत्रण निश्‍चितच स्वीकारतील असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. प्रधानंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बच्चन यांचे सलोख्याचे संबंध असून ते गुजरात राज्याचे बॅण्ड ऍम्बासिडरही आहे. इफ्फीचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावे अशी राज्यातील भाजप सरकारचीही इच्छा आहे. गेली काही वर्षे केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. तसेच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी व बच्चन यांचे संबंध बरे नसल्याने त्यांना इफ्फीसाठी निमंत्रित करण्यात येत नसे. पण आता मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्याने बच्चन यांच्याच हस्ते इफ्फीचे उद्घाटन व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न चालू झाल्याने ते नकार देण्याची शक्यता कमीच दिसत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply