ब्रेकिंग न्यूज़

इराणचा अमेरिकेला इशारा

आखातात वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. येथे सुरू झालेला संघर्ष कधीही नियंत्रणाबाहेर जाऊन अमेरिकेच्या सैनिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात असा इशारा इराणने दिला आहे. इस्लामिक रिपब्लिकवर आणखी निर्बंध लादण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणच्या सैन्यातील एका वरिष्ठ कमांडरने काल हा इशारा दिला.