इंधन दरवाढ करून भाजपकडून फसवणूक

भाजपने पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करून निवडणुकीवेळी दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासला असल्याची टीका काल कॉंग्रेसने केली. इंधनदर वाढवल्याने सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

भाजपने २०१२ साली निवडणूक जाहीरनाम्यात जनतेला वेगवेगळी आश्‍वासने दिली होती. त्यात राज्याला विशेष दर्जा, ५० हजार जणांना नोकर्‍या, पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट रद्द करून दर खाली आणणे आदींचा समावेश होता. मात्र, ती आश्‍वासने भाजप सरकारने पाळली नसल्याचा आरोप पणजीकर यांनी केला.