ब्रेकिंग न्यूज़
इंग्लंड पराभवाच्या दारात
Australia's Mitchell Marsh (R) celebrates scoring his century against England with his teammate and brother Shaun Marsh (L) on the fourth day of the fifth Ashes cricket Test match at the SCG in Sydney on January 7, 2018. / AFP PHOTO / WILLIAM WEST / -- IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE --

इंग्लंड पराभवाच्या दारात

पाचवा कसोटी सामना जिंकून ऍशेस मालिका ४-० अशी खिशात घालण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलियाला आज इंग्लंडचे केवळ ६ गडी बाद करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३०३ धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडची चौथ्या दिवशी दुसर्‍या डावात ४ बाद ९३ अशी दयनीय स्थिती झाली आहे. कर्णधार ज्यो रुट याने बोटाच्या दुखापतीनंतरही नांगर टाकताना ४२ धावा केल्या असून जॉनी बॅअरस्टोव १७ धावा करून त्याला साथ देत आहे.

तत्पूर्वी, शॉन व मिचेल मार्श या बंधूंनी एकाच डावात शतके झळकावून अशी कामगिरी करणारी ऑस्ट्रेलियाची तिसरी जोडी होण्याचा मान मिळविला. ग्रेग चॅपेल व इयान चॅपेल तसेच स्टीव व मार्क वॉ या बंधूंनी ऑस्ट्रेलियाकडून असा कारनामा केला आहे. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आठव्यांदा असे झाले आहे. मिचेल मार्शने १४१ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह १०१ धावा केल्या तर शॉनने २९१ चेंडूंचा सामना करत १५६ धावांची मोठी खेळी साकारली. टिम पेन (३८) व पॅट कमिन्स (२४) नाबाद असताना स्टीव स्मिथने कांगारूंचा डाव घोषित केला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने ३४ षटके गोलंदाजी करताना ५६ धावांत १ गडी बाद केला.