इंग्लंडच लॉडर्‌‌स!

>> आयर्लंडचा दुसरा डाव ३८ धावांत आटोपला

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा दुसरा डाव अवघ्या ३८ धावांत संपला. यामुळे इंग्लंडने या चार दिवसीय कसोटीच्या तिसर्‍याच दिवशी १४३ धावांनी विशाल विजय साकार केला. दुसर्‍या डावात जेम्स मॅक्कलमने सर्वाधिक ११ धावा केल्या. इंग्लंडचा गोलंदाज क्रिस वोक्सच्या भेदक मार्‍यापुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नागी टाकली. ख्रिस वोक्सने ७.४ षटकांत १७ धावा देत आयर्लंडचे सहा गडी बाद केले. ब्रॉडने सहा बळी घेत त्याला सुरेख साथ दिली.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद ८५
आयर्लंड पहिला डाव ः सर्वबाद २०७
इंग्लंड दुसरा डाव ः (९ बाद ३०३ वरून) ः स्टुअर्ट ब्रॉड नाबाद २१, ओली स्टोन त्रि. गो. थॉम्पसन ०, अवांतर १२, एकूण ७७.५ षटकांत सर्वबाद ३०३
गोलंदाजी ः टिम मुर्ता १८-३-५२-१, मार्क अडेर २०-७-६६-३, बॉईड रँकिन १७-१-८६-२, स्टुअर्ट थॉम्पसन १२.५-०-४४-३, अँडी मॅकब्रिन १०-१-४७-०
आयर्लंड दुसरा डाव ः विल्यम पोर्टरफिल्ड झे. बॅअरस्टोव गो. वोक्स २, जेम्स मॅक्कोलम झे. रुट गो. वोक्स ११, अँडी बालबिर्नी झे. रुट गो. ब्रॉड ५, पॉल स्टर्लिंग त्रि. गो. वोक्स ०, केविन ओब्रायन पायचीत गो. ब्रॉड ४, गॅरी विल्सन पायचीत गो. वोक्स ०, स्टुअर्ट थॉम्पसन झे. रुट गो. वोक्स ४, मार्क अडेर त्रि. गो. ब्रॉड ८, अँडी मॅकब्रिन झे. रुट गो. ब्रॉड ०, टिम मुर्ता त्रि. गो. वोक्स २, बॉईड रँकिन नाबाद ०, अवांतर २, एकूण १५.४ षटकांत सर्वबाद ३८
गोलंदाजी ः स्टुअर्ट ब्रॉड ८-३-१९-४, ख्रिस वोक्स ७.४-२-१७-६

कसोटीतील नीचांकी धावसंख्या
२६ ः न्यूझीलंड वि. इंग्लंड, ऑकलंड १९५५, ३० ः द. आिफ्रिका वि. इंग्लंड, पोर्ट एलिझाबेथ १८९६, ३० ः द. आफ्रिका वि. इंग्लंड, एजबेस्टन १९२४, ३५ ः द. आफ्रिका वि. इंग्लंड, केपटाऊन १८९९, ३६ ः द. आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न १९३२, ३८ ः आयर्लंड वि. इंग्लंड, लॉडर्‌‌स २०१९