आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचे सर्वेक्षण करण्याची गरज

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नोकरी व शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. सर्वसामान्य गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज आहे, असे माजी खासदार तथा भाजपचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर यांनी काल सांगितले.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे सर्वेक्षण नसल्याने या आरक्षणाचा किती लोकांना लाभ होईल हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाकडे या सर्वेक्षणाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही, असे ऍड. सावईकर म्हणाले.