आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेंनी भरला वाळपईतून उमेदवारी अज

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणेंनी भरला वाळपईतून उमेदवारी अज

>> सत्तरी कॉंग्रेसमुक्त करण्याचा केला निर्धार

सत्तरीत कॉंग्रेसचे अस्तित्व नसून येत्या निवडणुकीत कॉंग्रेसमुक्त सत्तरी करणार असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी वाळपई मतदारसंघात भाजपातर्फे उमेदवारी दाखल केल्यानंतर सांगितले. काल त्यांनी भाजपातर्फे वाळपई मतदार संघात उमेदवारी दाखल केली.
डमी उमेदवार म्हणून सौ. दिव्या राणे यानी उमेदवारी भरली. उमेदवारी झाल्यानंतर त्यानी आपण बारा हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. जुने भाजपा कार्यकर्ते कोणाबरोबर असतील याबद्दल बोलताना जुन्या भाजपा कार्यकर्त्यांचा आपणास पाठिंबा असल्याचे एक दोन कार्यकर्त्यांची नावे घेऊन सांगितले. विश्‍वजीत राणे काल सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वाळपई मामलेदार कार्यालयात आले. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी सौ. दिव्या राणे, नगरगांव पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे, वाळपई पालीकेच्या उपनगराध्यक्षा परविन शेख नगरसेवक रामदास शिरोडकर, विनोद शिंदे, उब्लासिंह राणे, सय्यद सरफर्राज, अतुल दाणवे, सखाराम गावकर उपस्थित होते.