आपले सैनिक मारले गेल्याची चिनची कबुली

लडाखच्या गलवान खोर्‍यात १५ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात भारतीय जवानांच्या प्रत्युत्तरात चीनचा कमांडिंग ऑफिसरही मारला गेलाय. तसेच आपले सैनिक ठार झाल्याचे प्रथमच चीनने मान्य केले आहे.

२० पेक्षा कमी सैनिक मारले गेल्याचेही चीनने म्हटले आहे. भारतीय जवानांनी १६ जवानांचे मृतदेह चीनकडे सुपूर्द केले, याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चीनने ही कबुली दिलीआहे.