ब्रेकिंग न्यूज़

आत्माराम बोरकर, १८ जून रस्त्यांवर पे पार्किंग योजना

>> मनपाच्या बैठकीत निर्णय

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील १८ जून रस्ता आणि आत्माराम बोरकर (एबी) रस्त्यावर पे पार्किंग योजना राबविण्याचा निर्णय महानगरपालिका मंडळाच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

शहरातील पार्किंगमध्ये शिस्त आणण्याच्या उद्देशाने प्रायोगिक तत्त्वावर १८ जून रस्ता आणि एबी रस्ता या दोन प्रमुख रस्त्यांवर पे पार्किंग योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार गाड्यांसाठी २ तासांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच पुढील प्रत्येक तासासाठी १० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दुचाकीसाठी ४ तासांसाठी ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच पुढील प्रत्येक तासासाठी २ रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.

मनपा महापौरांना स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर प्रतिनिधित्व देण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. सांतईनेज मधील कब्रस्तानमध्ये केवळ मृत व्यक्तीच्या दफनाच्या वेळी प्रार्थनेसाठी मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.