आणखी कोविड इस्पितळाची गरज नाही : विश्‍वजित राणे

राज्यात आणखी एक कोविड इस्पितळ सुरू करण्याची गरज नसल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्पष्ट केले.
कोविडसाठीचे चाचणी किट्‌स तसेच रुग्णांसाठीच्या खाटा व अन्य साहित्य याबाबत चिंता करण्याची गरज नसून योग्य ती सोय उपलब्ध असल्याचे राणे म्हणाले. आम्हाला व्हेंटिलेटर्सची गरज असून आणीबाणीच्या प्रसंगी व्हेंटिलेट्‌र्सची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी २०० व्हेंटिलेटर्सची ऑर्डर दिलेली असून त्यापैकी १०० व्हेंटिलेटर्स येत्या २-४ दिवसात मिळतील. सध्या ७० व्हेंटिलेटर्स आमच्याकडे आहेत, असे ते म्हणाले. सध्या राज्यात ऍक्टिव्ह असलेल्या सर्व कोरोना रुग्णांची स्थिती चांगली असून घाबरण्याचे कारण नसल्याचेही राणे यानी नमूद केले.