आज, उद्या जोरदार पावसाची शक्यता

राज्यात काही भागात मंगळवार १४ आणि बुधवार १५ जुलैला जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली असून केसरी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत केपे येथे सर्वाधिक ३.४० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाची रिपरिप सुरूच असून राज्यभरात चोवीस तासात १.८५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

पेडणे येथे २.७० इंच, सांगे येथे २.३० इंच, काणकोण येथे २.१४ इंच, पणजी येथे १.७७ इंच, फोंडा येथे १.३७ इंच, ओल्ड गोवा येथे १.६२ इंच, साखळी येथे १.८४ इंच, दाभोळी येथे १.५२ इंच, मडगाव येथे १.३० इंच तर मुरगाव येथे १.५५ इंच पावसाची नोंद झाली आहे.