आंतरराष्ट्रीय ड्रग्स पॅडलर पेद्रो डुराटेला गोव्यात अटक

विदेश विभागाने इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स डीलर पेद्रो डुराटे ओलिवेरा सोऊ याला ताब्यात घेतले आहे. गोवा पोलिसांनी यासंबंधीची माहिती ब्राझीलच्या भारतातील दूतावासाला दिली आहे. ड्रग्स डीलर पेद्रो ओलिवेरा याला म्हापसा येथील विदेशी नागरिक स्थानबद्धता केंद्रात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

ब्राझीलमधील अनेक गुन्हेगारी प्रकरणात ड्रग्स डीलर पेद्रो ओलिवेराचा सहभाग असून अंमली पदार्थांच्या तस्करीत त्याचा सहभाग आहे. त्याला पकडण्यासाठी ब्राझीलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. इण्टरपोलच्या माध्यमातून त्याचा शोधही सुरू होता. तो भारतात आल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विदेश विभागाला यासंबंधी सूचना देण्यात आली होती. त्यात संशयिताच्या भारतातील वास्तव्याबद्दल माहिती होती.
मुंबई विदेश विभागाच्या कार्यालयातून गोव्याला या संबंधी माहिती दिल्यानंतर गोवा पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. त्याला नेमके कुठे पकडण्यात आले या विषयी माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.