ब्रेकिंग न्यूज़
अवरलेडी ऑफ रोझरी हायस्कूलला जेतेपद

अवरलेडी ऑफ रोझरी हायस्कूलला जेतेपद

फातोर्डाच्या अवरलेडी ऑफ रोझरी हायस्कूलने अंतिम सामन्यात मडगावच्या लोयोला हायस्कूलचा २-० अशा गोलफरकाने पराभव करीत फा. पीटर एव्हीडी स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
एसव्हीडी सेमिनारी दामोण राय मैदानावर खेळविण्यात आलेल्या या अंतिम सामन्यात ४०व्या मिनिटाला जॉर्डन बॉर्जीसच्या क्रॉसवर राखीव खेळाडू मायकल डायसने हेडरद्वारे प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवित अवरलेडी ऑफ रोझरी हायस्कूलला १ -० अशी आघाडी मिळवून दिली.

तर जॉर्डन बॉर्जीसने इंज्युरी वेळेत संघाच्या २-० अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नांेंदविला. विजेत्या संघाला रु. २०,००० व चषक तर उपविजेत्या संघाला रु. १५,००० व चषक प्राप्त झाला. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट स्ट्रायकर – रुईया नोरोन्हा (लोयोला हायस्कूल), उत्कृष्ट गोलरक्षक – नॅश डिसोझा (लोयोला हायस्कूल) यांची वैयक्तिक बक्षिसांसाठी निवड झाली.

बक्षीस वितरण सोहळ्याला कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जिल्हा पंचायत सदस्या सौ. फातिमा गावकर, आर्नोल्ड डिकॉस्ता, ऍन्थनी पांगो, जॉन डिसिल्वा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.