अल्टिमेट टेबल टेनिस लीग आजपासून

अल्टिमेट टेबल टेनिस लीगला आजपासून त्यागराज क्रीडा संकुलात प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांना संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात होणार असून स्टार स्पोटर्‌‌स ३ वाहिनीवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. विद्यमान विजेता दबंग दिल्ली व पुणेरी पलटन यांच्यात शुभारंभी लढत होणार आहे. भारताचे आघाडीचे टेबलटेनिसपटू जी. साथियान, मनिका बत्रा, शरथ कमल यांच्यासह इतर देशातींल काही दिग्गज आपली प्रतिभा या स्पर्धेतून दाखवतील. पुणेरी पलटन, चेन्नई लायन्स व यू मुंबा यांचा हा पहिलाच मोसम असेल. विजेत्या संघाला ७५ लाख, उपविजेत्याला ५० लाख, उपांत्य फेरीत पराजित संघांना प्रत्येकी २५ लाख तसेच इतर वैयक्तिक बक्षिसांसाठी २५ लाख राखून ठेवण्यात आले आहेत.

अल्टिमेट टेबल टेनिस वेळापत्रक ः २५ जुलै ः दबंग दिल्ली वि. पुणेरी पलटन, २६ जुलै ः चेन्नई लायन्स वि. यू मुंबा, २७ जुलै ः आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाता वि. गोवा चॅलेंजर्स, २८ जुलै ः चेन्नई लायन्स वि. पुणेरी पलटन, २९ जुलै ः दबंग दिल्ली वि. यू मुंबा, ३० जुलै ः आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाता वि. पुणेरी पलटन, ३१ जुलै ः चेन्नई लायन्स वि. गोवा चॅलेंजर्स, १ ऑगस्ट ः आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाता वि. यू मुंबा, २ ऑगस्ट ः दबंग दिल्ली वि. गोवा चॅलेंजर्स, ३ ऑगस्ट ः पुणेरी पलटन वि. यू मुंबा, ४ ऑगस्ट ः दबंग दिल्ली वि. आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाता, ५ ऑगस्ट ः यू मुंबा वि. गोवा चॅलेंजर्स, ६ ऑगस्ट ः चेन्नई लायन्स वि. आरपीएसजी मेव्हरिक्स कोलकाता, ७ ऑगस्ट ः पुणेरी पलटन वि. गोवा चॅलेंजर्स, ८ ऑगस्ट ः चेन्नई लायन्स वि. दबंग दिल्ली, ९ ऑगस्ट ः उपांत्य फेरी संघ १ वि. संघ ४, १० ऑगस्ट ः संघ २ वि. संघ ३, ११ ऑगस्ट ः अंतिम फेरी