‘अम्फान’ चक्रीवादळाचा काही राज्यांना वेधशाळेचा इशारा

 

कोरोना महामारीच्या संकटाचा धोका कायम असतानाच आता देशातील काही राज्यांसमोर ‘अम्फान’ या चक्रीवादळाचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. प. बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तशा संकटाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. देशातील आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज दि. १६ रोजी अंदमान-निकोबारसह लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.