ब्रेकिंग न्यूज़

अमृतसर रेल्वे अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश

अमृतसर
अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काल पत्रकार परिदेद्वारे दिले. चार आठवड्यात ही चौकशी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करताना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश असल्याचे सांगितले. या अपघातातील केवळ नऊ मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याचे ते म्हणाले. दुर्घटनेतील पीडितांना मदत म्हणून राज्यसरकारने ३ कोटी रुपये दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.