अनुरा उपविजेती

योनेक्स सनराईज अखिल भारतीय सीनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे सदर स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी सातवे मानांकन लाभलेल्या अनुराला अंतिम फेरीत तिसर्‍या मानांकित आकार्षी कश्यपने २१-१२, २१-१६ असे सहज पराभूत केले. उपविजेतेपदानंतर अनुराने मध्य रेल्वे, जीनो फार्मास्युटिकल्स, गोवा क्रीडा प्राधिकरण व गोवा बॅडमिंटन संघटनेचे सहकार्याबद्दल आभार मानले. अनुरा आता मंगोलिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत सहभागी होणार आहे. यानंतर युएस ओपन ग्रांप्री व युएस आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये ती खेळेल.