ब्रेकिंग न्यूज़
अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणासाठी किम तयार
U.S. President Donald Trump shakes hands with North Korean leader Kim Jong Un at the Capella Hotel on Sentosa island in Singapore June 12, 2018. REUTERS/Jonathan Ernst - RC171C6FE700

अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणासाठी किम तयार

>> सिंगापूरमध्ये ट्रम्प – किम ऐतिहासिक भेट

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतिक्षित ऐतिहासिक भेट अखेर काल झाली. सिंगापूरमधील कॅम्पेला हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांत तब्बल ५० मिनिटे झालेल्या चर्चेत उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने संपूर्ण अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाची तयारी दर्शवली आहे. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी एका करारावर स्वाक्षर्‍या केल्या असून त्यात अमेरिका आणि उत्तर कोरियात मैत्रीचा नवा अध्याय असा उल्लेख करण्यात आला आहे.

भारतीय वेळेनुसार, सकाळी साडेसहा वाजता ट्रम्प-किम यांच्यातील चर्चेला सुरुवात झाली. या ऐतिहासिक भेटीनंतर ट्रम्प यांनी किम यांचे कौतुक करत चर्चा खूपच चांगली झाल्याच्या सांगितले. दोघेही एकत्र आल्यास यश हमखास मिळू शकते आणि तो दिवस लवकरच येईल, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला. किम यांच्याशी पुन्हा भेट होईल. त्यांना आपण व्हाईट हाऊसमध्ये भेटीसाठी बोलावणार असे ट्रम्प यांनी जाहीर केले.

दरम्यान, ट्रम्प – किम भेटीनंतर करार झाला असला तरी उत्तर कोरियावरील निर्बंध कायम राहतील असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर कोरिया आपल्याकडील सर्व अण्वस्त्र नष्ट करत नाही तोपर्यंत त्यांच्यावरील निर्बंध कायम राहतील, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.