अखेर ‘राफेल’ भारतात दाखल

एकाच वेळी वेगवेगळी कामे करण्याची क्षमता असलेल्या राफेल विमानांच्या पाच विमानांचा पहिला ताफा काल बुधवारी भारतात दाखल झाला. पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरूपी तळ राहणार आहे.

फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरून सोमवारी सकाळी उड्डाण केलेली ही विमाने संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर एक दिवस थांबून काल बुधवारी भारतात दाखल झाली. यातील तीन विमाने एखा सीटची तर दोन दुहेरी सीटची आहेत.

फ्रान्समध्ये प्रशिक्षण घेतलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले आहेत. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी आयएफचे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. २० ऑगस्टला राफेलचा भारती हवाई दलात समावेश करण्यात येईल.

एकूण ३६ विमाने २०२२ पर्यंत फ्रान्स भारत देशाला देणार असून त्यातील पहिली पाच विमाने काल दाखल झाली आहेत. लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.