अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय ६५ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार : विश्‍वजित राणे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या निवृत्ती वय ६० वर्षावरून ६५ वर्षे करण्याच्या प्रश्‍नावर चर्चा करणार असून अंगणवाडी सेविकांचे वय वाढविण्याच्या प्रश्‍नावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन महिला व बालकल्याण मंत्री विश्‍वजित राणे यांनी येथे काल दिले. महिला व बालकल्याण खात्याने आयोजित केलेल्या पोषण आहार कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री राणे बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची उपस्थिती होती.